100+ Good Morning Wishes In Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी

Good Morning Wishes In Marathi:- (शुभ सकाळ शुभेच्छा मराठी) नमस्कार मित्रांनो, marathistore4u.in या वेबसाईटवर आपले स्वागत आहे.मित्रानो,आम्ही तुमच्या साठी शुभ सकाळ मराठी संदेश,गुड मॉर्निंग मेसेज मराठी,शुभ सकाळ शुभेच्छा,गुड मॉर्निंग मैसेज, शुभ सकाळ संदेश, shubh sakal sandesh, shubh sakal marathi madhe, shubh sakal marathi sms, shubh sakal shubhechha, suprabhat shubh sakal, shubh sakal marathi post, shubh sakal status marathi आणले आहेत. त्यातून तुम्ही whatsapp, facebook and sharechat वर आपल्या मित्र-मैत्रिणीना, नातेवाईकांना, कुटुंबीयांना तसेच प्रिय व्यक्तिला शुभ दिवसाच्या सुंदर सुविचारच्या शुभेच्छा देऊ शकाल.

Table Of Content

गुड मॉर्निंग मेसेज | Good Morning Wishes,Sms In Marathi

Best Good Morning Wishes In Marathi

  1. 🙏🙏️आपले दुःख मोजक्या एक टक्का माणसांजवळच व्यक्त करावे. कारण पन्नास टक्के लोकांना काही पर्वा नसते आणि एकूणपन्नास टक्के लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचा आनंदच होतो असतो.🙏🙏.
  2. 🙏🙏आपल्या प्रतिष्ठेपेक्षा आपल्या चारित्र्यावर लक्ष द्यावे कारण चारित्र्य म्हणजे जे आपण आहोत आणि प्रतिष्ठा म्हणजे जी लोक बनवतात🙏🙏
  3. 🙏🙏आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय.उदात्त दु:ख हेच क्षुद्र दु:खावरचं या जगातलं उत्कृष्ट औषध आहे.🙏🙏
  4. 🙏🙏आळसाला आपण आजचा दिवस बहाल केला की आपला उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजाव🙏🙏
  5. 🙏🙏आपल्या स्मृतीतून जो नाहीसा होत नाही तो अमरच..!प्रत्येकाला आयुष्यात अशी वेगवेगळी अमर माणसं भेटत असतातच. ती माणसे आपल्याबरोबरच शेवटचा श्वास घेतात..🙏🙏
  6. “कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून, जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय…”
  7. 🙏🙏संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यावे.प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतात ते फक्त आपण घेतलेले निर्णय.🙏🙏
  8. 🙏🙏साध्या सरळ माणसांचा कधीही कोणताही ब्रँड नसतो खरंतर साधी माणसचं “माणुसकीचा ब्रँड असतात”..🙏🙏
  9. 🙏🙏सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद विश्वास आणि प्रेमात आहे , तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे.. म्हणून आपल्या मनात भ्रमाला कधीही आसरा देऊ नये 🙏🙏
  10. 🙏🙏आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते,तेव्हा जीवन जगण्याची कला कळते.🙏🙏
Good Morning Wishes In Marathi
Good Morning Wishes In Marathi

शुभ सकाळ संदेश | Subhsakal Sandesh Marathi

Good Morning Wishes In Marathi

  1. 🙏🙏आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा विमा कोणता असेल तर तो,
    “ईश्वरावर आपला विश्वास…”
    फक्त हे लक्षात ठेवा आणि…
    “चांगल्या कर्माचा हफ्ता” वेळेत भरत रहा.🙏🙏
  2. 🙏🙏आयुष्याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडून जातो.🙏🙏
  3. 🙏🙏आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागेल…याची भीती किंवा अहंकार म्हणजेच असत्याची जवळीक🙏🙏
  4. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं……!मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य……!!रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय – मौन………!!!
  5. 🙏🙏जीवन चहा बनवण्यासारखे असते …. अहंकाराला उकळू द्यावे, चिंतांची वाफ होऊन उडून जाऊ द्यावे, दु:खांना विरघळून जाऊ द्यावे, चुकांना गाळून घ्यावे आणि सुखाचा आनंद मनमुराद घ्यावा.🙏🙏
  6. 🙏🙏पाणी गढूळ झालं तर त्याला ढवळत बसू नये तर शांत ठेऊन द्यावं.मग “गाळ” आपोआप बसतो. तसेच जीवनात जर ताण आला तर बेचैन होण्यापेक्षा शांत राहून विचार करावा, उपाय नक्की सापडतो.🙏🙏
  7. 🙏🙏आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने आपला प्रवास सुरु होतो संघर्षाकडे पाठ कधीच फिरवू नये. तर त्याला सहप्रवासी बनवावे. 🙏🙏
  8. 🙏🙏दु:ख, आनंद, जय-पराजय, हसू-आसू, जन्म-मरण, विरह-मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढचं काय ते नवीन. पुन्हापुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरण.🙏🙏
  9. 🙏🙏इट जस्ट हँपन्स’ म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात, ती जास्त जगतात. अश्रू गाळण्यात आपलं वीस टक्के आयुष्य वाया जात असेल. काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जातं. 🙏🙏
  10. 🙏🙏आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते🙏🙏

शुभ सकाळ स्टेटस | Good Morning Status In Marathi

Good Morning Wishes In Marathi

  1. 🙏🙏असामान्य असं काही नसतं. पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो. स्वत:च्या कुवतीप्रमाणे जो तो साधनं निवडतो. ती गौण नसतातच . ती नाममात्र असतात.प्रश्न असतो भक्तीभावाचा! शंभर वर्ष तप करून शंकराला एकेक शीर अर्पण करणारा लंकाधिपती असतो, तर तुळशीच्या पानावर दैवताला जिंकणारेही असतात🙏🙏.
  2. 🙏🙏’नाही’ म्हणण्यातही मोठा आनंद असतो.नकार दिला म्हणजे मग त्या व्यक्तिच्या अस्तित्वाला अर्थ येतो.जो प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणतो,त्याच्या होकाराला कालांतराने ‘अर्थ’ उरत नाही.🙏🙏
  3. 🙏🙏नातं म्हणजे काय???
    नातं म्हणजे
    परिक्षा नाही पास किंवा नापास ठरवायला.
    नातं म्हणजे
    स्पर्धा नाही, जिंकणं किंवा हरणं ठरवायला.
    नातं म्हणजे
    काही कोड नाही जे काही करून दोघांनी सोडवलंच हवं..
    नातं म्हणजे
    न तुटणारा विश्वास एकमेकांवरचा,
    नातं म्हणजे
    साथ जी कायम टिकून रहावी,
    नातं म्हणजे
    प्रेम कधीच न संपणार,
    समोरच्याच्या मनाची काळजी तुम्हि, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नातं🙏🙏
  4. 🙏🙏देव काही जगात येऊन कुणाला सांगत बसत नाही. तो काही बोलतच नाही. तेव्हा देवाची भीती काही नाही. जी काही भीती आहे ती माणसाची माणसाला. माणूसच माणसाला केव्हातरी पकडतो. माणसाला चुकवलं म्हणजे झालं.🙏🙏
  5. 🙏🙏अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास, जो आपल्या कानात हळूच सांगत असतो सर्व कांही चांगलं होईल,काळजी करू नका. .🙏🙏
  6. चार वेदांचा अर्थ नाही समजला
    तर काही हरकत नाही
    पण
    समझदारी, जबाबदारी,
    ईमानदारी आणि आज्ञाधारीया चार शब्दांचा अर्थ जरी कळला
    तरीही मनुष्याचे जीवन सार्थक होऊन जाईल.
  7. ✍️ हातात हात घेतला तर मैत्री होते
    दोन्ही हात जोडले तर भक्ति होते..
    कुणाला हात दिला तर मदत होते..
    हाताचे महत्व इतके की अनेक
    हात पुढे आले तर अशक्य ते
    शक्य होते.
  8. 🙏🙏चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते. 🙏🙏
  9. 🙏🙏एखाद्याला आपले महत्व पटत नसेल आणि आपले महत्त्व पटवून द्यायचे असेल ,तर त्यांच्या पासुन थोडे दूर रहावे,आणि आपली उणीव त्यांना जाणवुन द्यावी🙏🙏
  10. 🙏🙏आयुष्यात अचूक व योग्य निर्णय घेणयाची क्षमता अनुभवातुन येत असते.काहीवेळेस माञ अनपेक्षित अनुभव हा बहुतेकदा चुकीच्या माणसा पासुन व निर्णयातून पण येत असतो.यासाठी नेहमी सतर्क रहावे.🙏🙏

हेहि पहा :- 300+ रोचक तथ्य(Facts)

Good Morning Wishes In Marathi

गुड मोर्निंग मेसेज | Shubsakal Sandesh Marathi

  1. 🙏🙏माणूस जन्माला आला की त्याच्या आयुष्याला कौतुक आणि टीका दोन्ही चिकटते. लहानपणी फक्त कौतुक वाट्याला येते.मात्र जसजसे कळण्या – सवरण्याचे वय होऊ लागते तसतसे हळू हळू ‘टीका’ नामक घटना घडू लागतात..
    जसे कौतुक सगळ्यांना हवे हवेसे असते तशी टीका कोणालाच आवडत नाही.🙏🙏
  2. 🙏🙏”नाती-प्रेम-मैत्री” तर सगळीकडेच असतात.
    पण “परीपूर्ण तिथेच होतात”
    जिथे त्यांना “आदर आणि आपुलकी” मिळते.🙏🙏
  3. 🙏🙏 मानवी शरीर हा एक विलक्षण कॉम्प्युटर असून तुम्ही त्याला ‘विचार-उच्चार-आचार’ यांच्या द्वारा जे शुभ किंवा अशुभ फिडींग कराल त्याप्रमाणे तुम्हांला सुख-दु:खाचे रिझल्टस् मिळतील🙏🙏.
  4. ☝️ सोनं अंगावर घातले म्हणजे, माणूस मौल्यवान होतो असे नाही…
    तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायंला हवी…!
    🙏
  5. 🙏🙏अहंकार आणि संस्कार यामध्ये फार मोठा फरक आहे कारण अहंकाराने माणूस दुसऱ्याला झुकवतो आणि संस्काराने तो स्वतः झुकतो.🙏🙏
  6. 🙏🙏आयुष्य खूप साधं असतं,
    कधी कधी खूप रटाळ असतं.
    आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे.
    श्वास घेणे आणि सोडणे याला जगणं म्हणत नाहीत.
    प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे🙏🙏
  7. 🙏🙏श्रेष्ठता जन्माने मिळत नसते. ती आपल्यामध्ये असलेल्या गुणांवर अवलंबून असते त्यातूनच ती मिळते किंवा आपणास स्वप्रयत्नाने मिळवावी लागते. 🙏🙏
  8. 🙏🙏 काही समस्या सल्ला-मसलतीने सोडवता येतात. ते सल्ले आपण ऐकतोच असं नाही. ऐकायचं बंधन नसल्यामुळे आपण सल्ले मागत फिरतो आणि अनेकांचं डोकं उठवतो. विचारणाऱ्याचा गोंधळ वाढतो. सल्ला देणाऱ्यांचा अहंकार.🙏🙏
  9. 🙏🙏प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मन धावतं होतं. हे मनाचं प्रकरण छान आहे. जागा न सोडता ते हजारो मैल भटकत आणि सगळ्यांना भेटतं. पण शरीर त्यापैकी एकदोन ठिकाणीच जाऊ शकतं. 🙏🙏
  10. 🙏🙏’नाही’ म्हणण्यातही मोठा आनंद असतो.नकार दिला म्हणजे मग त्या व्यक्तिच्या अस्तित्वाला अर्थ येतो.जो प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणतो,त्याच्या होकाराला कालांतराने ‘अर्थ’ उरत नाही.🙏🙏

शुभ सकाळ मराठी संदेश | Good Morning quotes Marathi

Good Morning Wishes In Marathi

  1. 🙏🙏तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते🙏🙏
  2. 🙏🙏वेळ पुरत नसला की तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो. मधे लुडबूड करत नाही. आपण त्याला वापरतो, पण तो स्वत:च अस्तीत्वही प्रकट करत नाही. पण वेळ जेव्हा उरतो, तेव्हा त्याच्यासारखा वैरी नाही. तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो. असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते क्षण मोकळे म्हणायचे, पण ते क्षण भकास असतात.🙏🙏
  3. 🙏🙏मानवी जीवनात मैत्री ही कांद्यासारखी असते, तिच्यात अनेक पदर असतात आणि त्या मुळे जीवनात चांगली चव येत असते ,परंतु तीच मैत्री कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर हिच मैत्री डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहात नाही. 🙏🙏
  4. 🙏🙏महत्वं कळले तरचं …….त्याचे मोल आणि वापर कळतोमग ती………व्यक्ती असो की वस्तु शब्द असो की पाणी🙏🙏
  5. सहजते मधला प्रामाणिकपणा आणि चतुरतेतला खोटेपणा यातला अंतर एकदा समजलं कि माणसाचे हेतूही समजायला लागतात. शुभ सकाळ👏🏻👏🏻
  6. ✒️ ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते,म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव असावी . सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं,पद सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो…..
  7. 🙏🙏सामर्थ्य हे जिंकण्यातून मिळत नसते तर ते संघर्षातून निर्माण होत असते.🙏🙏
  8. 🙏🙏मखमलीचा अंगरखा घातला की बघणार्‍याचे डोळे दिपतात. पण तो अंगरखा घालणार्‍याला आतलं अस्तरच स्पर्श करीत असतं. तशा काही व्यथाच असत🙏🙏
  9. 🙏🙏नात गरज पाहून जोडूनये ते सवय म्हणून जोडावे करण गरज कधीतरी संपते सवय मात्र सुटत नाही🙏🙏
  10. 🙏🙏प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात “वेटिंग पिरियड” असतो. त्या वेदना ज्याच्या त्याला माहित असतात. पण “प्रसूतिवेदानांशिवाय” ज्यांना “अपत्यप्राप्ती” हवी आहे, त्यांच्याबद्दल काय बोलावं.? हाच जमाना सध्या वाढतोय🙏🙏

शुभ सकाळ | Good Morning Wishes In Marathi

  1. 🙏🙏जीवनाच्या वाटेवर अडचणी या गतिरोधकाचे काम करतात ,त्यावेळी आपली गती कमी करणे ठीक आहे परंतु त्यांना भिऊन वाटेत थांबनं चुकीचं आहे. त्यातूनच मार्ग काढत पुढे जाणच योग्य आहे .जर येणाऱ्या परिस्थितीवर आपले मजबूत नियंत्रण असेल तर वाटेत विष ओकणारे पण आपले काही करू शकत नाहीत🙏🙏
  2. 🙏🙏आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो, तो खरा आनंदी व्यक्ती.🙏🙏
  3. 🙏🙏मनाला वेग येतो तेव्हा काळ नेहमीच छोटा वाटतो. क्षण लहान होतो आणि मनाला वेग पेलत नाही तेव्हा क्षण युगासारखा होतो.🙏🙏
  4. 🙏🙏माणसाच्या आयुष्यातील काही गोष्टी फारच विचित्र आहे …
    माणसाकडे काही काळासाठी सुख आले तर तो सहज घटाघटा पिऊन टाकतो पण जेव्हा दुःख येते तेव्हा मात्र त्याला चघळत बसतो …
    खरंतर समोरचा अडचणीत असेल तेव्हा आपल्याकडे धनाची मुबलकता नसली तरी चालेल पण चांगल्या मनाची नक्कीचं पाहिजे …!!!🙏🙏
  5. 🙏🙏विचार करण्याची पध्दत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे.🙏🙏
  6. 🙏🙏प्रत्येक माणूस नेहमी चांगल्या वेळेची आतुरतेने वाट पाहत असतो …पण चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात …कारण चांगल्या माणसांच्या संगतीमुळे चांगली वेळ नक्कीच येऊ शकते …!!!🙏🙏

तर ही आमची आजची पोस्ट होती ज्यात आम्ही तुम्हाला Subhsakal Sandesh Marathi सांगितले आहे आणि जर तुम्हाला ही शुभ सकाळ शुभेच्छा मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा. .

आमच्या इतरही पोस्ट वाचा. HOME ला भेट द्या.