Gudi Padwa Wishes In Marathi :- नमस्कार.. मित्रांनो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये आम्ही गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडवा शुभेच्छा संदेश, गुढीपाडवा शुभेच्छा स्टेटस, Gudi padwa sms in marathi घेऊन आलो आहोत.जे तुम्ही आपल्या मित्रांना व परिवारातील प्रियजनांना त्यांच्या गुढीपाडवा शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबुक(Facebook) वर पाठवुन त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी देऊ शकता.
Gudi Padwa Festival Information | Gudi Padwa Mahiti
Table Of Content
गुढीपाडवा का साजरा केला जातो? (Why Gudipadva is celebrated?)
Gudi Padwa Information In Marathi: गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिके प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
गुढीपाडवा कसा साजरा केला जातो?
Gudi Padwa Badal Mahiti Marathi: या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.
गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.
गुढीपाडवा सांस्कृृतिक इतिहास (Gudipadva Cultural History)
- ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे.
- श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
- शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.
- प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले.
गुढीपाडवा शुभेच्छा 2023 संदेश मराठी | Gudi Padwa Wishes In Marathi

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास,
नव्या वषाची हिच तर खरी सुरुवात.. गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी,
आयुष्याला लाभो तेजोमयी किनार,
हीच सदिच्छा…नववर्षाच्या निमित्ताने आज !
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा शुभेच्छा मराठी | Best Gudi Padwa Wishes In Marathi
गुळ-खोब-याचा गोडवा
त्यावर कडुलिंबाचा स्वाद
रेशमी गुढी उभारून घाला
निरोगी आरोग्याला साद!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 2022
गुढी मराठी संस्कृतीची गुढी मराठी अस्मितेची!
आपणांस व आपल्या परिवारास
हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
कितीही दुःख आली तरी नवी सुरूवात होतेच
हाच घेऊनी संदेश आले आहे नवचैतन्याचे नववर्ष
गुढीपाडव्याच्या हार्दिश शुभेच्छा..
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा..
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी नववर्षाच्या शुभेच्छा | Happy Gudi Padwa message Marathi
या वर्षी मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणार नाही तर तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे.
ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे..
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!
जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
रेशमी गुढी, कडुलिंबाचं पान,
खोब-याची वाटी गुळाची ढाप
हे वर्ष जावो तुम्हाला आरोग्यदायी अन् छान!
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना गुढीपाडवा 2022 च्या शुभेच्छा..
गुढीपाडवा शुभेच्छा स्टेटस | Gudi Padwa wishes status Marathi
चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमची सारी स्वप्न पूर्ण होवो
मनात घेऊन हि इच्छा
पाठवत आहे तुम्हाला आज
गुडी पाडव्याच्या शुभेच्छा.2023
आला सण गुढीपाडव्याचा नाती,
परंपरा जपण्याचा दु:ख सारे विसरूया
नववर्ष साजरे करुया
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चित्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आज मराठी वर्षातील पाहिला दिवस..
आजपासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या
व गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला
हार्दिक शुभेच्छा..!
FAQ About Gudi Padwa 2023
गुढीपाडवा कोणती राज्ये साजरा करतात?
गुढीपाडवा महाराष्ट्रात साजरा केला जातो आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लोक उगादी पाळतात. दोन्ही सण हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करतात.
गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे?
हे वसंत ऋतूचे आगमन आणि रब्बी पिकांच्या कापणीला सूचित करते. हा सण पौराणिक दिवसाशी जोडलेला आहे या दिवशी हिंदू देव ब्रह्मदेवाने वेळ आणि विश्व निर्माण केले. काहींच्या मते, ते अयोध्येतील रामाचा दुष्ट रावणावर विजय मिळवल्यानंतर झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण करते.
या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला gudi padwa 2023 | gudi padwa information | gudi padwa in marathi | gudi padwa 2023 marathi | gudi padwa information in marathi | gudi padwa badal mahiti marathi | gudi padwa chi mahiti | gudi padwa festival information | gudi padwa mahiti | gudi padwa quotes in marathi | gudi padwa wishes | gudi padwa why it is celebrated | gudi padwa info | gudi padwa details | Gudipadwa Wishes 2023 in marathi | Happy Gudi Padwa Wishes In Marathi | गुडी पाडवा स्पेशल स्टेटस | गुडी पाडवा शुभेच्छा संबंधित सर्व माहिती दिली आहे आवडली असेल. आपण शेअर करू शकता.
आमच्या इतरही पोस्ट वाचा. Marathistore4u.in ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.