How To Download E-PAN In Marathi | ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे? 5 मिनिट

Download E-PAN In Marathi:- आयकर रिटर्न भरणे असो किंवा बँकेशी संबंधित कोणतेही काम असो, पॅनकार्ड म्हणजेपरमनंट अकाउंट नंबर हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. गुंतवणुकीतही त्याचा उपयोग होतो. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी, कार खरेदीवेळी पॅन कार्ड कॉपी मागितली जाते. 50 हजारांहून अधिकच्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड महत्त्वाचं ठरतं. (PanCard Number)पॅन कार्ड नंबरमध्ये कर आणि एखाद्या व्यक्तीच्या गुंतवणुकीशी संबंधित डेटा असतो. परंतु अनेकदा प्रत्येक ठिकाणी पॅन कार्डची फिजिकल कॉपी घेऊन जाणं शक्य होत नाही. मात्र, पॅन कार्ड हरवणे तुमच्यासाठी समस्या बनू शकते. अशा परिस्थितीत पॅन कार्ड नसल्यास अनेक कामं अडकू शकतात. त्यामुळे पॅन कार्डची ई-कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी मोबाइलवर डाउनलोड करणं अतिशय फायद्याचं ठरतं.

ई-पॅन कार्ड म्हणजे काय? | What is e-PAN card in Marathi?)

e-PAN Means In Marathi:-तुम्ही ई-पॅन कार्डला डिजिटल किंवा ऑनलाइन पॅन कार्ड देखील म्हणू शकता. हे तुमच्या पॅन कार्डचे आभासी(वर्चुअल)रूप आहे. ई-पॅन हे पॅन कार्डच्या मूळ प्रतीपेक्षा बरेच चांगले आहे. ते गमावण्याचा धोका नाही. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा पडताळणीसाठी तुम्ही फिजिकल पॅन कार्डप्रमाणे वापरू शकता. विशेष म्हणजे तुम्ही काही मिनिटांत ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

Download E-PAN In Marathi
Download E-PAN In Marathi

इतर पोस्ट:-व्हॉट्सअ‍ॅप वर कोविड-19 लस प्रमाणपत्र कसे मिळवायचे

ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे? | How to get E-PAN In Marathi

  1. सर्वप्रथम, आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या ‘ई-पॅन डाउनलोड करा’ पर्यायावर जावे लागेल.
    त्याची लिंक: https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
  2. येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
  3. त्यानंतर, आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा.
  4. ते तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकण्यास सांगेल. त्यानंतर, अटी व शर्ती स्वीकारा.
  5. तुम्हाला OTP मोबाईल वर किंवा ई-मेल पाहिजे ते निवडा.
  6. तुम्ही अटी आणि शर्ती स्वीकारल्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP एंटर करा आणि सबमिट बटणावर टॅप करा.
  7. त्यानंतर, एक पेमेंट पर्याय उघडेल. येथे तुम्हाला ₹8.26 भरावे लागतील, जे तुम्ही UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे अदा करू शकता.
  8. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही तुमचे ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.

पॅन कार्डची पीडीएफ फाईल पासवर्ड संरक्षित असेल. त्याचा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल.

आम्ही तुम्हालाए e-pan,ई-पॅन डाउनलोड कसे करतात हे सांगितले आणि त्या ई-पॅन डाउनलोड करणे महत्त्वाचे का आहे देखील स्पष्ट केली. आम्हाला आशा आहे की तुम्हाला तुमच्या समस्येचे निराकरण मिळाले आहे.

आमच्या इतरही पोस्ट वाचा. HOME ला भेट द्या.

आशाच महत्त्वाचे माहिती Video आमच्या InWorld Marathi Youtube Channel वर दिले आहेत एकवेळ आवश्य पहा.

2 thoughts on “How To Download E-PAN In Marathi | ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे? 5 मिनिट

Leave a Reply