101+ Makar Sankranti Wishes Marathi 2022: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश

Makar Sankranti Wishes Marathi:- यंदा मकर संक्रांती हा सण 14 जानेवारी रोजी आहे. त्यानिमित तुमच्या मोठ्यांना तसेच मित्रमंडळींना या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सोशल मिडियाचा वापर करु शकता.

मोबाईलवरुन मेसेजेस, ग्रिटींग्सद्वारे तुम्ही एकमेकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला छान मराठीतील शुभेच्छा संदेशांची आवश्यकता पडेल. त्यासाठी आम्ही खाली कांही खास  मकर संक्रांतीचे शुभेच्छा संदेश दिले आहेत.

मकरसंक्रांत सणाची माहिती | Makar Sankranti Information Marathi

मकर संक्रांति माहिती(About Makar Sankranti In Marathi):- मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. मकरसंक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणत.

मकरसंक्रांतीला वाण का वाटतात?

‘वाण देणे’ म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते.

Makar Sankranti Wishes Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

1.आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला!

2.“मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगाचा,
बंध दाटत्या नात्यांचा, आणि
शुभेच्छा आपल्याला संक्रांतीच्या.”

3.गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..!

4.नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

Makar Sankranti Marathi Wishes | Makar Sankranti Sms On Marathi

5.तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात
आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत..!

6.तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

Makar Sankranti Wishes Marathi
Makar Sankranti Wishes Marathi

7.गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

8.कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

9.नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

10.पैशाने श्रीमंत असणारी माणसे पावलो पावली भेटून जातील,
पण मनाने श्रीमंत असलेली माणसे भेटण्यासाठी पावले झिझवावे लागतात,
अश्याच माणसांना मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा.!

Makar Sankranti Wishes Marathi Messages | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश मराठी

11.दुःख सारे विसरून जाऊ,
गोड गोड बोलून आनंदाने राहू
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तिळगुळ घेऊन गोडगोड बोला.

12.तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

13.आकाशाला टेकतील असे हात नाहीत 
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, 
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे, 
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे . 
तिळगुळ घ्या गोड़ बोला

14.नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Happy Makar Sankranti Marathi | Makar Sankranti Marathi Quotes

15.ही मकर संक्रांत तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला,
नवचैतन्य, सुख शांती व प्रेम
देऊ जावो हीच आमची कामना.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

Makar Sankranti Wishes Marathi
Makar Sankranti Wishes Marathi

16.बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा ,असा
गोडवा आपल्या मैत्रित असावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.!!

17.कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो 
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो 
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा 
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या… 
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला.

18.म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

19.कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला….
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा..

20.दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

21.यंदा मकरसंक्रांतीला तुम्हाला मिळो तिळगूळासारख गोड प्रेम, पतंगासारखं यश आणि सर्व आनंद.
मकर संक्रांत हार्दिक शुभेच्छा.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे Makar Sankrant Wishes in marathi, Makar Sankrant Status Marathi, मकरसंक्रांती स्पेशल स्टेटस, मकरसंक्रांती शुभेच्छा, कलेक्शन खूप आवडला असेल.  आपण या मकरसंक्रांती मराठी शुभेच्छा संदेश शेअर करू शकता.

आशाच अनेक शुभेच्छा संदेश साठी आमच्या शुभेच्छा संदेश या कॅटेगरी ला भेट द्या.(उदा:-शुभ सकाळ शुभेच्छा संदेश)

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)

प्रश्न: मकर संक्रांती 2022 कधी आहे?, मकर संक्रांती मुहूर्त काय आहे?

उत्तर: यंदा सूर्य मकर राशीमध्ये 14 जानेवारीला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी प्रवेश करत आहे. मकर संक्रांतीची शुभ वेळ दुपारी 2 वाजून 43 मिनिट ते संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत आहे.

Leave a Reply