Tulsi Vivah Wishes In Marathi :- यंदा तुळशी विवाह हा 5 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानिमित तुमच्या मोठ्यांना तसेच मित्रमंडळींना या तुळशी विवाह सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सोशल मिडियाचा वापर करु शकता.
मोबाईलवरुन मेसेजेस, ग्रिटींग्सद्वारे तुम्ही एकमेकांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला छान मराठीतील शुभेच्छा संदेशांची आवश्यकता पडेल. त्यासाठी आम्ही खाली कांही खास तुळशी विवाहाचे शुभेच्छा संदेश दिले आहेत.

Table Of Content
तुलसी विवाह कथा(Tulsi Vivah Katha)
तुलसी ही जालंधर राक्षसाची पत्नी होती, ती पत्नी आणि उत्तम गुण असलेली स्त्री होती, परंतु तिच्या पतीच्या पापांमुळे दुःखी होती. म्हणूनच त्यांनी आपले मन विष्णुभक्तीमध्ये वाहून घेतले होते. जालंधरचा क्रोध खूप वाढला होता, त्यामुळे भगवान विष्णूने त्याचा वध केला. पतीच्या निधनानंतर पतिव्रता तुलसी सतीधर्म अंगीकारून सती झाली. त्याच्या राखेतून तुळशीच्या रोपाचा जन्म झाला असे म्हणतात आणि त्याच्या विचारांमुळे आणि गुणांमुळेच तुळशीचे रोप इतके गुणवान झाले. तुळशीच्या गुणांमुळे भगवान विष्णूंनी तिच्या पुढच्या जन्मी तिच्याशी विवाह केला. या कारणास्तव दरवर्षी तुळशी विवाह साजरा केला जातो.चला पाहूयात Tulsi Vivah Wishes In Marathi
तुळशी विवाह शुभेच्छा संदेश | Tulsi Vivah Wishes Marathi
अंगणात तुळस,
आणी शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणि
नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
चला वाटूया पेढे आणि गाऊया मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे आपल्या लाडक्या तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज सजली तुळस शालु हिरवा नेसून, कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान..
अंगणात उभारला आज विवाह मंडप, ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास..
मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी, आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी..
आहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर, पण येताना जरूर तुम्ही आणावा आहेर… तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
ऊसाचे मांडव सजवूया आपण,
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल,
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
सॉरी Friends,
I Am Very सॉरी..!!
लग्न इतक्या गडबडीत ठरलं,
आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!
त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,
ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत
पत्रिका पोहचो न पोहचो तरी
हेच निमंत्रण समजुन तुम्ही या..
लग्नाची तारीख 5-11-2022 आहे, संध्याकाळीः 7:30 वा..
.
.
.
.
आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!
तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान
उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!!
इतर पोस्ट :- 100+ शुभ सकाळ शुभेच्छा संदेश
तुळशी विवाह सुभेच्छा | Tulsi Vivah Sms,Massage In Marathi
शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी
मंजिरीची बहू आवड कमळारमणासी
तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी
विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा लग्न सोहळ्यात सामील
मोठया जल्लोषात साजरा करुया तुळशी विवाह
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tulsi Vivah Wishes In Marathi/Tulsi Vivah Massage In Marathi
ज्या अंगणात तुळस आहे,
ती तुळस खूप महान आहे,
ज्या घरात असते ही तुळस,
ते घर स्वर्गसमान आहे.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वात सुंदर तो नजारा असेल,
जेव्हा भिंतींवर दिव्यांची माळ असेल,
प्रत्येक अंगणात तुळस विराजमान होईल,
जेव्हा तुळशीचा विवाह होईल.
तुळशी विवाहाच्या खूप सा-या शुभेच्छा!!
अंगणात उभारला विवाहमंडप
त्यात सजली उस आणि झेंडुच्या फुलांची आरास
तुळशी विवाह साजरी करुया आपण
कारण आज आहे तुळशी विवाहाचा दिवस
तुळशी विवाह शुभेच्छा स्टेटस | Tulsi Vivah Wishes Status In Marathi
तुळशीचे पान
एक त्रैलोक्य समान,
उठोनिया प्रात: काली
करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
सारे आप्तेष्ठ, मित्र मंडळी झाली मग्न
कारण सर्व मिळून साजरे करणार तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तुळस लावली अंगणी
आज आहे तिचा विवाह
येताय ना लग्नाला, आज आहे फक्त आनंदी आनंद
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
तुळशीविना घराला घरपण नाही
तुळशीविना अंगणाला शोभा नाही
जिच्या असण्याने सर्वांना मिळते ऑक्सिजन
त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
चला वाटूया पेढे आणि गाऊया मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे आपल्या लाडक्या तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा Tulsi Vivah Wishes In Marathi/तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, कलेक्शन खूप आवडला असेल. आपण या तुळशी विवाह स्टेटस (Tulsi Vivah Status In Marathi) शेअर करू शकता.
आमच्याशी संपर्कात रहा. तुम्ही आम्हाल इंस्टाग्राम वर फोलो करू शकता. Follow
नवीन पोस्ट चे नोटिफिकेशन मिळवत रहाण्यासाठी स्क्रीन वरील डाव्या बाजूची Subscribe बेल टॅप करा.
आमच्या इतरही पोस्ट वाचा. HOME ला भेट द्या.