PM Kisan Ekyc: पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pm Kisan ekyc Marathi: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे की, तुमच्या मोबाईलवर Pm Kisan Ekyc कशी करायची याची पूर्ण माहिती आम्ही आज देणार आहोत पूर्ण माहिती वाचा आणि pm kisan e-kyc करा ऑनलाइन आपल्या मोबाईलवर चला तर पाहूया. 

पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी दरम्यान ई-केवायसी (eKYC) केले नसेल, तर तुमचे हप्त्याचे २००० रुपये थांबू शकतात. e-KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 मार्च होती ती आता कृषी विभागाच्या माहितीनुसार 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तुम्ही घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया ऑनलाइन करू शकता.

Pm Kisan ekyc 2022
Pm Kisan ekyc 2022 Marathi

Table Of Content

पीएम किसान योजना काय आहे?

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

Pm Kisan ekyc कशी करावी? | Pm Kisan e-kyc Process Marathi

Pm Kisan aadhaar ekyc Online

  1. सर्वप्रथम तुम्हाला गव्हर्मेंट च्या या वेबसाईटवर जायचे आहे त्याची लिंक पुढे दिलेली आहे. Pm Kisan e-kyc
  2. या वेबसाईटवर गेल्यावर तुमच्यासमोर पी एम किसान पेज ओपन होईल त्याच्यानंतर उजव्या बाजूला Farmers Corner मध्ये E-kyc असे ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करा.
  3. त्याच्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल आधार कार्ड नंबर टाका तिथे आधार कार्ड नंबर टाका आणि सर्च क्लिक करा.
  4. नवीन बॉक्स ओपन होईल  तुमच्याकडे असणारा मोबाईल नंबर टाकायचा आहे. Get Mobile Otp वर किल्क करा.
  5. मोबाईल वर मिळालेला Otp टाका आणि सबमिट किल्क करा.
  6. नंतर Get Aadhar Otp वर किल्क करा. जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे. त्याच्यावर ओटीपी येईल.
  7. तुम्हाल मोबाईल वर मिळालेला Aadhar Otp टाका आणि Submit For Auth किल्क करा.
  8. तुम्हाला स्क्रीन मेसेज येईल eky is Sucessfully Submitted अशाप्रकारे तुम्ही PmKisan ekyc पूर्ण करू शकता.

Pm kisan ekyc Process

वाचा:- घरी बसल्या काढा ई-श्रम कार्ड(E-Shram Card).

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती समजली असेल, तरीही तुमच्या मनात कोणताही प्रश्न असल्यास, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

3 thoughts on “PM Kisan Ekyc: पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Leave a Reply