Sindhutai Sapkal Information In Marathi[2022] | सिंधूताई सपकाळ जीवनचरित्र, संस्था, पुरस्कार

Table Of Content

Sindhutai Sapkal Biography In Marathi

Sindhutai Sapkal Information In Marathi:- सिंधूताई सपकाळ (जन्म १४ नोव्हेंबर १९४८ – मृत्यू ४ जानेवारी २०२२) एक भारतीय समाजसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या ज्या विशेषतः अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात.त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सिंधूताई सपकाळ यांचा जीवनप्रवास | Sindhutai Sapkal Life

मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधूताई सपकाळ या ‘अनाथांच्या आई’ झाल्या. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभ्या केलेल्या कामाची राज्यासह राष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशंसा झाली. सिंधूताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा… पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे.

Sindhutai Sapkal biography/information in marathi
Sindhutai Sapkal information in marathi

वर्धा जिल्ह्यातील तत्कालीन मध्य प्रांतातील पिंप्री मेघे येथे जन्मलेल्या सिंधूताईंची कथा सुरुवातीला याहून वेगळी नाही; परंतु त्यांनी अन्यायाला वाचा फोडली. शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल त्यांनी आवाज उठवला; परंतु त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांचे चारित्र्य मलिन करणारे आरोप झाले, सासरच्यांनीही साथ सोडली अन् तिथून सुरू झाला सिंधूताईंचा संघर्ष. बेघर झाल्यानंतर त्या भटकत राहिल्या.
कधी रेल्वेत राहिल्या, तर कधी स्मशानात. पोटात भुकेचा आगडोंब घेऊन हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भीक मागण्याची वेळ आली; परंतु यातूनच त्यांना अनाथांच्या प्रश्नांचे भेदक दर्शन झाले. अनाथांची आई होण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली. भुकेलाच त्या आपली प्रेरणा मानतात. स्वत:ची भूक भागवितानाच अन्य भुकेल्यांना आपल्या घासातील घास देत त्यांनी जगावेगळा प्रपंच सुरू केला आणि आज तो चांगलाच फुलला आहे.

दरम्यान, सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’, इचलकरंजीचा प्रतिष्ठित ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’ इ. उल्लेखनीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या हस्ते त्यांना ‘आनंदमयी पुरस्कार’ही मिळाला आहे. पंजाबमधील लुधियानाच्या ‘सत्पाल मित्तल नॅशनल अॅवॉर्ड’च्याही त्या मानकरी आहेत. या पुरस्कारांसह इतर शेकडो पुरस्कार आणि सन्मानचिन्हे देऊन समाजातील अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केलं आहे.

सिंधूताई सपकाळ यांच्या संस्था | Institutions of Sindhutai Sapkal

ममता बाल सदन:- अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.

सिंधुताई यांनी स्थापन केलेल्या संस्था त्या याप्रमाणे-Sindhutai Sapkal Information In Marathi

  • बाल निकेतन हडपसर, पुणे
  • सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह ,  चिखलदरा
  • अभिमान बाल भवन, वर्धा
  • गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
  • ममता बाल सदन, सासवड
  • सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे

सिंधूताई सपकाळ पुरस्कार | Sindhutai Sapkaal Awards

  • 2021 – सामाजिक कार्य श्रेणीतील पद्मश्री
  • 2017 – भारताच्या राष्ट्रपतींकडून नारी शक्ती पुरस्कार
  • 2016 – डॉ. डी.वाय. यांनी मानद डॉक्टरेट. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे
  • 2016 – वोक्हार्ट फाउंडेशन कडून वर्षातील सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार
  • 2014 – अहमदिया मुस्लिम शांतता पुरस्कार
  • 2013 – सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा पुरस्कार
  • २०१३ – आयकॉनिक मदरसाठी राष्ट्रीय पुरस्कार
  • 2012 – CNN-IBN आणि रिलायन्स फाऊंडेशन द्वारे दिले जाणारे रिअल हिरोज पुरस्कार.
  • 2012 – सीओईपी गौरव पुरस्कार, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे यांनी दिला.
  • 2010 – अहिल्याबाई होळकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारने महिला आणि बालकल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना दिला.
  • 2008 – लोकसत्ता या दैनिक मराठी वृत्तपत्राद्वारे दिला जाणारा वुमन ऑफ द इयर पुरस्कार
  • 1996 – दत्तक माता पुरस्कार, ना-नफा संस्था सुनीता कलानिकेतन ट्रस्टने दिलेला
  • सह्याद्री हिरकणी पुरस्कार (मराठी: सह्याद्री हिरकणी पुरस्कार)
  • राजाई पुरस्कार (मराठी: राजाई पुरस्कार)
  • शिवलीला महिला गौरव पुरस्कार (मराठी: शिवलीला महिला गौरव पुरस्कार)

सिंधूताई सपकाळ चित्रपट | Sindhutai Sapkaal movie

अनंत महादेवन यांचा २०१० चा मराठी चित्रपट मी सिंधुताई सपकाळ हा सिंधुताई सपकाळ यांच्या सत्यकथेवर आधारित बायोपिक आहे. ५४व्या लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियरसाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली होती.

अशा प्रकारे आज आपण सिंधुताई सपकाळ | Sindhutai Sapkal Information In Marathi यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद Marathistore4u.in

इतर व्यक्ती जीवनचरित्र साठी बायोग्राफी Categorie पहा.

पोस्ट चे नोटिफिकेशन मिळवत रहाण्यासाठी स्क्रीनवरील Subscribe बेल टॅप करा.

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)

  1. प्रश्न: सिंधुताई सपकाळ यांच्या पतीचे नाव काय आहे? Name of Sindhutai Sapkal’s husband?

    उत्तर: श्रीहरी सपकाळ/Sreehari Sapkaal

  2. प्रश्न: सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीचे नाव काय आहे? What is the name of Sindhutai Sapkal’s daughter?

    उत्तर: ममता/Mamta

Leave a Reply