Soybean Seeds Germination: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे की, मित्रांनो खरिपाच्या पेरणी जवळ येत आहे. पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे बियाण्याची उगवण क्षमता. सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता कशी तपासायची याची पूर्ण माहिती आम्ही आज देणार आहोत चला तर पाहूया.

मित्रांनो चांगल्या उत्पनासाठी कोणतेही बियाणे २ वर्ष वापरणे योग्य आहे. परंतु योग्य उगवण क्षमतेअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ नये. यासाठी घरगुती बियाणे वापरण्याआधी उगवण क्षमता तपासणे खूप गरजेचे असते.

बियाणाची उगवण क्षमता म्हणजे काय? What is germination percentage in marathi?

पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाणापैकी कियी टक्के बियाणे उगवू शकते. याला उगवण क्षमता म्हणले जाते. उगवण क्षमता नेहमी टक्केवारी मध्ये मोजली जाते. ६० टक्केवारी खालील बियाणे पेरणी करू नये.

सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती | Methods of calculating Soybean Seeds Germinationon percentage

बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धत

१. एक डबा/वाटी मध्ये पाणी घ्यायचे आहे. नंतर शंभर बियाणे त्यामध्ये टाकून १५/२० मिनिटे भिजू देऊन काढून घ्यायचे आहे. आता ज्या बियाण्यावर सुरकुत्या पडल्या असतील ते बियाणे पेरणी साठी योग्य आहे. समजा १०० पैकी ८० बियानावर सुरकुत्या पडल्या असतील तर ८० टक्के बियाणे योग्य आहे.

२.एक पोत पूर्ण पणे भिजवून घ्या. १०० बियाणे १०X१० या पद्धतीने ठेवा आणि पोते गोल गुंडाळून ठेवा. दोन दिवस गुंडाळून ठेवलेल्या पोत्यावरती पाणी मारत रहा. तिसऱ्या दिवशी ते काढून किती बियांना कोंब आले आहे ते बगा. ज्या बियाना कोंब आले असतील ते बियाणे पेरणी साठी योग्य आहे. समजा १०० पैकी ८० बियानावर कोंब आले असतील तर ८० टक्के बियाणे योग्य आहे.

उगवण क्षमते नुसार बियाणे

Soybean Seeds Germination Capacity: सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता कशी तपासायची
Soybean Seeds Germination : सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता

हे देखील वाचा

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती समजली असेल, तरीही तुमच्या मनात कोणताही प्रश्न असल्यास, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसह Facebook, WhatsApp आणि Twitter वर शेअर करा.

आशाच महत्त्वाचे माहिती Video आमच्या मराठी वर्ल्ड Youtube Channel वर दिले आहेत एकवेळ आवश्य पहा.

By Pradip Bhosale

नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोर ही एक मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे ज्यामध्ये विविध विषयांवर माहिती दिली जाते. विविध विषयांची माहिती गोळा करून ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करतो. मराठीमध्ये जीवन परिचय, सण-उत्सव, सामान्य ज्ञान, शासकीय योजना, कविता, कथा, वित्त या विषयांवर माहिती लिहिली जाते. तुम्हाला आतापर्यंत माझ्या ब्लॉगबद्दल माहिती आहे, ज्यामध्ये तुम्ही काय वाचू शकता ते सांगितले आहे, परंतु आता मि थोडी माझी माहिती तुम्हाला सांगतो. माझे नाव प्रदीप भोसले आहे आणि मी महाराष्ट्रातील किल्लारी(लातूर) या छोट्याशा गावाचा रहिवासी आहे. मी छत्रपती शिवाजी कॉलेज, उमरगा येथून बी.एस.सी पूर्ण केली आहे. मी माझी पहिली नोकरी निखील कन्स्ट्रक्शन मध्ये सुरू केली, जी मी एप्रिल 2021 मध्ये सोडली. आता मी मराठी ब्लॉगिंग साइटची ओनर आहे.

One thought on “Soybean Seeds Germination: सोयाबीन बियाणे उगवण क्षमता कशी तपासायची, पेरणी प्रमाण”

Leave a Reply

Your email address will not be published.

Phonepe Cashback Fraud Info Marathi: अशी केली जाते लोकांची फसवणूक Maha HSC Board Result 2022: बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार Soybean Seeds: सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता कशी तपासायची पध्दत PM Kisan Ekyc: पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया PPF अकाऊंट म्‍हणजे काय?, कसे सुरु करावे | PPF Account Information