How To Close Demat Account In Marathi

Close Demat Account In Marathi:- जेव्हा तुम्ही गुंतवणूक आणि ट्रेडिंग करणे निवडता. तेव्हा शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी तसेच गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डिमॅट खात्याची गरज असते. डिमॅट खाते मेंटेन करण्याचा दरवर्षाला चार्ज द्यावा लागतो. त्यामुळे तुमचे डिमॅट अकॉऊंट विनाकारण चालू असेल तर, तुम्ही त्याला बंद करू शकता. जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. आणि ही एक महाग चूक असल्याचे सिद्ध होऊ शकते. अनेक लोकांना याबाबत माहिती नसते की डिमॅट अकॉऊंट कसे बंद करायचे?

डीमॅट खात्यांवर शुल्क आणि देखभाल शुल्क आकारले जाते. त्यामुळे, सर्व निष्क्रिय किंवा शून्य शिल्लक असलेली डिमॅट खाती बंद करणे शहाणपणाचे आहे. अन्यथा, आपण पैसे गमावू. त्यामुळे डीमॅट खाते कसे बंद करावे यासाठी सर्व योग्य स्टेप जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

सूचना:-हि माहिती Angel ब्रोकिंग डिमॅट खाते बंद करण्यासाठी ची आहे.(वेगळ्या ब्रोकरसाठी हि पध्दत वेगळी असू शकते.)

How To Close Demat Account In Marathi
How To Close Angel Broking Demat Account In Marathi

Table Of Content

डीमॅट खाते बंद करण्यापूर्वी/Before Close Demat Account In Marathi

लक्षात घ्या , तुम्हाला वैयक्तिकरित्या अर्ज सबमिट करावा लागेल, ज्यामध्ये आवश्यक कागदपत्रांची हार्ड कॉपी प्रदान करणे समाविष्ट आहे. तथापि, क्लोजर फॉर्म ऑनलाइन डाउनलोड करून, आपण निश्चितपणे प्रक्रिया सुलभ करू शकता.

डिमॅट खाते बंद करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत.

  • खात्यात कोणतेही शेअर्स नाहीत याची खात्री करा.
  • त्यांच्या खात्यात ऋण शिल्लक(negative balance)नसल्याचे सुनिश्चित करा. तुमच्या खात्याचे तपशील जाणून घेण्यासाठी, तुमच्या खात्यात लॉग इन करून किंवा तुमच्या नोंदणीकृत शाखेशी संपर्क करून ते तपासा.
  • एंजेल वन वेबसाइटवरून खाते बंद करण्याचा फॉर्म डाउनलोड करा.

अकॉऊंट क्लोजर फॉर्म डाऊनलोड करा. त्या फॉर्मला पूर्ण भरा.

इतर पोस्ट :-समीर चौघुले बायोग्राफी

ऑफलाइन डीमॅट खाते कसे बंद करावे?(Close Demat Account Offline In Marathi)

तुमचा क्लोजर फॉर्म सबमिट करताना तुम्ही खालील तपशील भरल्याची खात्री करा:

  • तुमचा आयडी
  • डीपी आयडी
  • KYC तपशील जसे की नाव
  • पत्ता जे तुमच्या रेकॉर्डशी जोडला आहे.
  • डीमॅट खाते बंद करण्याचे कारण सांगा.
  • सही करा.
  • हा फॉर्म एंजेल वन च्या मुख्य कार्यालयास स्पीड पोस्ट द्वारे पाठवा.

एंजेल ब्रोकिंग ऑफिस पत्ता(Angel Broking Main Office Address)

G-1, Ackruti Trade Center, Road No. 7, MIDC, Andheri (E), Mumbai – 400 093

ऑनलाइन डीमॅट खाते कसे बंद करावे?(Close Demat Account Online In Marathi)

[email protected]m या पत्यावर तुम्हाला पुढील प्रकारे इमेल करावा लागेल.

  • Email Id :- [email protected]
  • Subject :- I want to close my account.
  • Name :-
  • Client Id:-
  • Reason:- I don’t have fund.

असा इमेल पाठवल्या नंतर 2 दिवसामध्ये डीमॅट खाते बंद होईल.

डीमॅट खाते बंद करण्यासाठी किती चार्ज लागतो?

डिमॅट अकॉऊंट बंद करण्यासाठी कोणताही चार्ज लागत नाही.

या पोस्टद्वारे, आम्ही तुम्हाला मराठीमध्ये एंजेल ब्रोकिंग डीमेट खाते बंद करण्याविषयी माहिती(How to Close Angel Broking Demat Account In Marathi) देण्याचा प्रयत्न केला आहे.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची हि पोस्ट आवडली असेल, आणि हि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर डीमेट खाते कसे बंद  करावे यात कांही अडचणी असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून आम्ही तुम्हाला वेळेत मदत करू शकू.

आमच्याशी संपर्कात रहा. आणि हा लेख मित्रांना शेअर करा.

पोस्ट चे नोटिफिकेशन मिळवत रहाण्यासाठी स्क्रीन वरील डाव्या बाजूची Subscribe बेल टॅप करा.

आमच्या इतरही पोस्ट वाचा. HOME ला भेट द्या.

By Pradip

नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोर ही एक मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे ज्यामध्ये विविध विषयांवर माहिती दिली जाते. विविध विषयांची माहिती गोळा करून ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करतो. मराठीमध्ये जीवन परिचय, सण-उत्सव, सामान्य ज्ञान, शासकीय योजना, कविता, कथा, वित्त या विषयांवर माहिती लिहिली जाते. तुम्हाला आतापर्यंत माझ्या ब्लॉगबद्दल माहिती आहे, ज्यामध्ये तुम्ही काय वाचू शकता ते सांगितले आहे, परंतु आता मि थोडी माझी माहिती तुम्हाला सांगतो. माझे नाव प्रदीप आहे आणि मी महाराष्ट्रातील किल्लारी(लातूर) या छोट्याशा गावाचा रहिवासी आहे. मी छत्रपती शिवाजी कॉलेज, उमरगा येथून बी.एस.सी पूर्ण केली आहे. मी माझी पहिली नोकरी कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये सुरू केली, जी मी एप्रिल 2021 मध्ये सोडली. आता मी मराठी ब्लॉगिंग साइटची ओनर आहे.

2 thoughts on “How To Close Demat Account In Marathi | डीमॅट खाते कसे बंद करावे? किती चार्ज लागतो?”

Leave a Reply