MSRTC Passes Aavdel Tithe Pravas : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन आवडेल तेथे प्रवास योजना 2023

MSRTC Passes information: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आवडेल तेथे प्रवास करण्याची योजना सन १९८८ पासून चालू केली आहे या योजनेच्या अंतर्गत ४ दिवसाचा आणि ७ दिवसाचा पास दिला जातो. ची पास किंमत ५८५ रुपये ते ३०३० रुपये पर्यंत असते.(msrtc pass yojana) या योजनेमध्ये तुम्ही साधी, जलद, रातराणी, शहरी व यशवंती या महाराष्ट्र राज्यातील बस तुम्ही प्रवास करू शकता तसेच हिरकणी व शिवशाहीमध्ये सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता या योजनेचे काही नियम आहेत त्या नियमांमध्ये ७ दिवस व ४ दिवसाचे पास तुम्हाला दिले जातात साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या सेवेसाठी असणाऱ्या ज्यामध्ये साधी, जलद, रातराणी,शहरी, यशवंती या आंतरराज्य महामार्ग मध्ये चालणाऱ्या गाड्या यांचा समावेश असतो निमआराम बस साठी स्वातंत्र दर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने निश्चित केले आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पास दर | MSRTC Passes Price/Rate

MSRTC Passes price/rate

शिवशाही(msrtc shivshahi pass) बससाठी देण्यात येणाऱ्या पास हा शिवशाही बसेस साधी निमआराम विनावाता अनुकूलित या सर्व सेवांसाठी आंतरराज्य म्हणजे फक्त महाराष्ट्र करिता असणार आहे. दहा दिवस अगोदर हे पास दिले जातात. तुम्हाला करण्याच्या दहा दिवस अगोदर या पाससाठी अर्ज करावा लागतो. आवडेल तेथे प्रवास करा या योजनेचा पास नियमित बससेस सोबत कोणत्याही जागा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बस मध्ये सुद्धा ग्राह्य असतात. त्यामुळे तुम्हाला तिथे फिरायचं आहे तिथे तुम्ही करू शकता प्रवास करणाऱ्या पास धारकाकडे पास आहे. म्हणून प्रवेश नाकारू नये असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ स्पष्ट केले आहे.

जर तुम्हाला आरक्षित जागा पाहिजे असेल तर त्याची वेगळी रक्कम भरून तुम्ही जागा आरक्षित करू शकणार आहात. ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित प्रवास करता येईल. पास अहस्तांतरणीय आहे तुम्ही म्हणजेच कोणाला देता येणार नाही. तो पास फक्त तुम्हाला वापरायचा आहे. पासचा गैरवापर झाला असे निदर्शनास आल्यास तुमचा तो पास जप्त करण्यात येतो.

सोयाबीन बियाणे उगवण क्षमता कशी तपासायची, पेरणी प्रमाण

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पास नियम | MSRTC Passes Guidelines

प्रवासामध्ये कोणती वस्तू जर तुम्ही घेऊन जात असेल तर किंवा त्या वस्तूचे नुकसान झालं तर यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात महामंडळ त्याच्यासाठी जबाबदार राहणार नाही. या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास ३० किलो व १२ वर्षाखालील मुलास १५ किलो प्रवासी सामान विनाआकार नेता येईल. पास हरविल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही. वा हरविलेल्या पासाचा कोणताही परतावा दिला जाणार नाही.

आवडेल तेथे प्रवास दिवसाची गणना हि रात्री १२:00(बारा) ते २४:00 (बारा) केली जाते पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर २४.०० वा.नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील. काही वेळा रा.प.बसेस उशिरा सुटल्यामुळे,मार्गस्थ बिघाड झाल्यामुळे अगर काही अपरिहार्य कारणामुळे जी बस नियोजित पोहचण्याची वेळ २४.०० पूवी होती ती २४.०० नंतर पोहचत असेल व पासधारकाचा प्रवास खंडित झाला नसल्यास पासधारकांकडून तिकीट आकार जात नाही.

पहा:- मासिक पास योजना माहिती(Msrtc Monthly Pass)

तुम्ही जवळच्या कोणत्याही बसस्थानकामध्ये जाऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पास | MSRTC Passes काढू शकता.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती समजली असेल, तरीही तुमच्या मनात कोणताही प्रश्न असल्यास, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसह Facebook, WhatsApp आणि Twitter वर शेअर करा.

Leave a Reply