100+ Motivational Quotes In Marathi For Life, Success, Student, Business | प्रेरणादायक सुविचार

Motivational Quotes In Marathi:- नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात मोटिवेशन हि एक महत्वाची गोष्ट आहे. निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात. परंतु, जर आपण निश्चित केलेल्या वेळत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह कमी होण्यास सुरवात होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये सकारत्मक विचाराची(Movtivation) कमतरता.

मित्रांनो, लोक एका रात्रीत यशस्वी होत नाहीत. एखाद्याचे यश, संपत्ती, आनंद आणि उज्ज्वल भविष्य यामागे कालांतराने होणारी कठोर परिश्रम असतात. या संपूर्ण विश्वात, फक्त एकाच गोष्टीवर तुमचे पूर्ण नियंत्रण आहे – ती म्हणजे तुमची विचारसरणी.

Table Of Content

यशासाठी प्रेरणादायी सुविचार | Motivational Quotes In Marathi For Success

ज्यांना जिंकायचं असत त्यांना माहिती असत,
कुठे लढायचं आणि कुठे शांत रहायचं.!

जिंकणे किंवा हरणे हे तुमच्या विचारांवर अवलंबून असते
मानलं तर पराभव होईल आणि ठरवलं तर विजय होईल.

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि
कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.

जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

Motivational Quotes In Marathi
Best Motivational Quotes In Marathi

“Success ची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते
कठोर परिश्रम करणार्‍यांवर फिदा होत.

येथे प्रत्येक पक्षी जखमी आहे.
पण जो पुन्हा उडू शकला तो तिथे जिवंत आहे.

मोती स्वतःहून किनाऱ्यावर येत नाहीत,
त्यांना मिळवण्यासाठी समुद्रात उतरावे लागते.

आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कुणीही हरवू शकत नाही .

Motivational Thoughts In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल
तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल
तर कारण सापडतात.

जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

ज्याने स्वतः खर्च केले आहे,
जगाने त्याला Google वर Search केले आहे.

काही प्रवास एकट्यानेच करावा लागतो;
आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात सोबती मिळत नाही!

आपण आयुष्यात किती वेळा हरलो आहे
काही फरक पडत नाही
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला होता!

प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्कि गाठतात.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.

Motivational Quotes About Life In Marathi | जीवनाबद्दल प्रेरणादायी विचार

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

आयुष्यातील बहुतेक चुका घाईत घेतलेल्या निर्णयांमुळे होतात;
विचार करा, विश्लेषण करा आणि मग त्यावर कृती करा.

पाठ नेहमी मजबूत असावी
कारण शाबासी आणि धोखा
दोघे मागून भेटतात.

आयुष्यात अंधाराला घाबरू नका,
कारण तारे फक्त अंधारातच चमकतात.

दुनिया आपल्याला तो पर्यंत हरवू शकत नाही,
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.

कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

आम्हाला आशा आहे Motivational Quotes Marathi या आमच्या लेखातील छान छान Motivational message Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Motivational Marathi SMS तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा.

तसेच तुमच्या कडे सुद्धा काही असेच Motivational Status Marathi असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आम्ही तुम्ही दिलेले Motivational Quotes Marathi आमच्या या लेखाच्या समाविष्ट करू.

नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोर ही एक मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे ज्यामध्ये विविध विषयांवर माहिती दिली जाते. विविध विषयांची माहिती गोळा करून ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करतो. आमच्या होम पेज HOME एकवेळ भेट द्या.

महत्त्वाचे माहिती Video आमच्या मराठी वर्ल्ड Youtube Channel वर दिले आहेत एकवेळ आवश्य पहा.

Leave a Reply