30+ Kojagiri Wishes In Marathi | कोजागरी पौर्णिमा शुभेच्छा मराठी 2021
Kojagiri Wishes In Marathi:- शरद ऋतूतील आश्विन महिना. आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच “कोजागरी पौर्णिमा” किंवा “शरद पौर्णिमा“. ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर कुणी कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात.
कोजागिरी पोर्णिमा ! कोऽजार्गति? कोऽजार्गति? म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत त आहे? असे विचारीत दुर्गा देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात.
Table Of Content
कोजागरी पौर्णिमेची कथा | Kojagiri Purnima Story In Marathi
कोजागरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत, त्यापैकी एक अशी सांगितली जाते की, एकदा एक राजा आपले सगळे वैभव्य आणि संपत्ती गमावून बसतो.त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात “अमृतकलश’ घेऊन प्रत्येकालाच विचारते, की “को जागर्ति…? को… जागर्ति…?’ म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? अन् तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साद देणाऱ्या सगळ्यांना ती “अमृत’ म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते.
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.

कोजागरी कशी साजरी करतात? | Kojagiri Wishes In Marathi
या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात.
इतर पोस्ट:-दिवाळीच्या शुभेच्छा संदेश 2021
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Happy Kojagiri Purnima Wishes Marathi
Kojagiri Wishes In Marathi
मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा विश्वास वाढू दे नात्याचा त्यात असुद्या गोडवा साखरेखा.कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी…कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी..कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
हे दूध केशरी, कोजागिरीचे खास वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर, अशा निवांत कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
आजचा दिवस खूप सुखकारक आणि आनंदमयी जावो..आनंदाची उधळण आपल्यावर नेहमीच होवो..कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज कोजागिरी पौर्णिमा! आजचा दिवस तुम्हाला खूप सुखकारक व आनंदाची उधळण करणारा जावो हीच सदिच्छा…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
साखरेचा गोडवा केशरी दुधात, विरघळला तुझ्या माझ्या नात्यात, रेंगाळत राहो अंतर्मनात, स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना…कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी, कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चंद्राची सावली, चांदणे, कोमलता, उदारता, प्रेमलता आपल्या परिवाराला कोजागिरी च्या हार्दिक शुभेच्छा.
कोजागिरी पौर्णिमा संदेश मराठी | Kojagiri Purnima Messages In Marathi
kojagiri shubhechha
शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र चंद्राच्या मंद प्रकाशात, करू जागरण एकत्र मसाले दूधाचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे आनंदाची उधळण, आपल्या जीवनातही होऊ दे..कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो, परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो, निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ, आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राची शीतलता, शुभ्रता, कोमलता, उदारता, प्रेमलता आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना प्रदान होवो..कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
शरदाचे चांदणे
आणि कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात
जागरण करू एकत्र
दूध साखरेचा गोडवा
नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण
आपल्या जीवनी होऊ दे
आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरीचे चांदणे, हसतंय माझ्या अंगणात, दुग्धशर्करा योग यावा, जसा साऱ्यांचा जीवनात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा तो चंद्रमा पहा रे,
असतो नभात रोज तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला त्याच्या सवे रहा रे,
चषकातुनी दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही कोजागिरी करा रे…
कोजागिरी पोर्णिमेच्या शुभेच्छा…
कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव,
उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप
समन्वयाची अनुभूती.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा, सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात्र तु्झ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची
गगनात तुझ्याचसाठी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चांदण्यात न्हावून निघाली चांदरात, कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश….कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
कोजागिरी पौर्णिमेचे शुभेच्छा स्टेटस | Kojagiri Purnima Wishes Status
Kojagiri Purnima Wishes In Marathi
कोजागिरीची आज रात, पूर्ण चंद्रमा नभात, चमचमत्या ताऱ्याची वरात, चंद्राची शितलता मनात, मंद प्रकाश अंगणात, आनंद तराळला मनामनात…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरीचे जागरण हे जीवनातील सकारात्मकतेचे,
सौम्यतेचे, सौंदर्यनुभवाच्या सजगतेचे कारण बनणे
हीच या उत्सवाची सार्थकता
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरीचा चंद्र जसा चांदण्यासमवेत रमतो, त्याला पाहतात मला तुझा भास होतो… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरीचा चंद्र तोच पण वाटे नवा नवा, कितीही क्षण एकत्र घालवले तरी वाटे मज तुझा सहवास हवा हवा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते दूधात देखणे रूप चंद्राचे दिसते या शरद पौर्णिमेच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरीच्या चंद्राची किरणे खेळत होती पाण्यात, चांदणी रात पसरली होती धरती आणि अंबरात…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात, करू जागरण एकत्र
मसाले दूधाचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण, आपल्या जीवनातही होऊ दे
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरीला दिसतो जो चंद्रमा नभात, रोज मी पाहत असतो त्याला तुझ्या रूपात…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्राच्या साक्षीने मिळाली मसाले दुधाची मेजवानी
कोजागिरी रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…
भरून आली रात्र मंडळी जमली अंगणात जशा जमलेल्या चांदण्या सभोवती चंद्राच्या नभात कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाँना हार्दिक शुभेच्छा..
आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा Kojagiri Purnima shubhechha in marathi, Happy Kojagiri Wishes In Marathi, कोजागिरी स्पेशल स्टेटस, कोजागिरी शुभेच्छा, कलेक्शन खूप आवडला असेल. आपण या कोजागिरी मराठी शुभेच्छा संदेश शेअर करू शकता.
आमच्या इतरही पोस्ट वाचा. HOME ला भेट द्या.
FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)
-
कोजागरी कशी साजरी करतात?
-
कोजागरी पौर्णिमा म्हणजे काय?
शरद ऋतूतील आश्विन महिना. आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच “कोजागरी पौर्णिमा” किंवा “शरद पौर्णिमा“. ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर कुणी कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात.
कोजागिरी पोर्णिमा ! कोऽजार्गति? कोऽजार्गति? म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत त आहे? असे विचारीत दुर्गा देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. -
कोजागिरी पोर्णिमेला दुध का पितात?
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.